पनवेलः भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्ह्याची कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जाहीर केली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणूका पार पडल्या. त्यामध्ये बुथ अध्यक्ष पासून ते राष्ट्रीय अध्यक्षांची निवड नुकतीच करण्यात आली आहे. भाजपाच्या संघटनात्मक दॄष्टीने रायगड जिल्हयाचे दोन जिल्हे करण्यात आले. त्याप्रमाणे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पक्षाने जबाबदारी दिली. त्यांनी त्यांच्या कार्यकारिणीची घोषणा केली असून जिल्हा उपाध्यक्षपदी वसंत भोईर, रामदास ठोंबरे, सुनिल घरत, श्रीकांत पुरी, विठ्ठल मोरे, के. के. म्हात्रे, प्रल्हाद केणी, निळकंठ घरत, जिल्हा सरचिटणीसपदी श्रीनंद पटवर्धन, दीपक बेहेरे, विनोद साबळे, संघटन सरचिटणीसपदी अविनाश कोळी, चिटणीसपदी शरद कदम, रमेश मुंडे, रमेश नायर, गीता चौधरी, ऍड. आशा भगत, कोषाध्यक्षपदी सनी यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी अश्विनी पाटील, युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी मयुरेश नेतकर, अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रकाश बिनेदार, किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी अशोक गायकर तर जिल्हा प्रकोष्ठमध्ये कामगार आघाडीच्या जिल्हा संयोजकपदी जितेंद्र घरत, उत्तर भारतीय आघाडी जिल्हा संयोजकपदी डी. एन. मिश्रा, उद्योग आघाडी जिल्हा संयोजकपदी मंदार मेहंदळे, व्यापारी आघाडी जिल्हा संयोजकपदी अशोक ओसवाल, भटके- विमुक्त आघाडी जिल्हा संयोजकपदी बबन बारगजे, वैद्यकीय सेलच्या जिल्हाध्यक्षपदी जिल्हा संयोजकपदी डॉ. बबन नागरगोजे, मच्छिमार सेलच्या जिल्हा संयोजकपदी गणेश नाखवा, सोशल मिडीयाच्या जिल्हा संयोजकपदी प्रसाद मांडलेकर, माजी सैनिक सेलच्या जिल्हा संयोजकपदी समशेरसिंग जाखड, अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या जिल्हा संयोजकपदी काशिनाथ पारठे, तर ट्रान्सपोर्ट सेलच्या जिल्हा संयोजकपदी सुधीर घरत यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment