Skip to main content

खेलो इंडिया युथ गेम' स्पर्धेत पनवेलच्या स्वस्तिकची चमकदार कामगिरी

 


 


 


 


 


 


 



पनवेल :  राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने सर्वोत्कृष्ठ कामगिरी करणारी आणि ज्युनिअर गटातील जागतिक मानांकनात सहाव्या क्रमांकावर असलेल्या टेबल टेनिस 


पटू स्वस्तिका घोष हिने आसाम येथे झालेल्या 'खेलो इंडिया युथ गेम २०२०' राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आणखी एक चमकदार कामगिरी केली आहे. 


     या कामगिरीबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, तसेच रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते संजय कडू यांनी आज (दि. १६) स्वस्तिकाचे अभिनंदन करून तीला पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. 


       केंद्र शासनाच्या निर्देशनानुसार दरवर्षी विविध क्रीडा प्रकार असलेल्या 'खेलो इंडिया युथ गेम' या स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्या अनुषंगाने आसाममध्ये हि स्पर्धा पार पडली.  या स्पर्धेतील कनिष्ठ एकेरी स्पर्धेत रजत तर दुहेरी गटात कांस्य पदक पटकाविले तसेच महाराष्ट्राच्या संघाने टेबल टेनिसमध्ये एकूण ९ पदके जिंकून या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले त्यामध्ये स्वस्तिकाचे योगदान महत्वपूर्ण ठरले. 


       टेबल टेनिस पटू स्वस्तिका घोष हिने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने दर्जेदार कामगिरी आंतरराष्ट्रीय मानांकनात सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.  खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलची ती इयत्ता अकरावीची विद्यार्थीनी असून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिकाला फ्रान्स येथे प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत, तसेच रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सरावासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.  स्वस्तिकाने देशात व परदेशात झालेल्या टेबलटेनिस स्पर्धेत चमकदारी कामगिरी करीत देशाचे नाव उंचाविले आहे.हॉंगकॉंग, जॉर्डन, कोलंबो, यांसह इतर देशामध्ये झालेल्या स्पर्धेत स्वस्तिकाने अजिंक्यपद पटकाविले आहे.  स्वस्तिकाने लहानपणापासून टेबलटेनिस खेळात आपली आवड व नैपुण्य दाखविले आहे.  त्यामुळे तीला 'विराट कोहली फाऊंडेशन' कडून स्कॉलरशिपही जाहीर झाली आहे. ती भारतातील एकमेव टेबल टेनिस खेळाडू आहे, जी या संस्थेद्वारे स्कॉलरशिपसाठी निवडली गेली आहे.  स्वास्तिकाचे वडील संदीप घोष हे या खेळातील प्रशिक्षक आणि सल्लागार आहेत. ओमान येथे झालेल्या 'ओमान ओपन' स्पर्धेत भारतीय कर्णधार म्हणून यशस्वी जबाबदारीही स्वस्तिकाने पार पडली, त्यावेळी या स्पर्धेत तीने कांस्य पदक मिळविले आणि पदक मिळविणारी भारताची एकमेव खेळाडू ठरली.  स्वास्तिकाने २०१३ मध्ये गुजरातमध्ये राष्ट्रीय रँकिंग सेंट्रल झोन टेबल टेनिस चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर अंडर १२ टेबल टेनिस श्रेणीतील ऑल इंडिया रँक ०१ प्राप्त केली आणि त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. प्रत्येक वर्षी त्यांनी आपल्या खेळातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती दाखविली आहे.  मागिल वर्षी पुणे येथे राज्य सरकारच्या माध्यमातून झालेल्या स्पर्धेतही स्वस्तिकाने सुवर्णयश कामगिरी केली होती. 


Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

  मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे.