पनवेल महानगर पालिकेत पत्रकारांसाठी सुसज्ज पत्रकार कक्ष तात्काळ मिळण्यासाठी पनवेल ते मंत्रालय चालत मोर्चा
राजे प्रतिष्ठानतर्फे १२ मार्चला चालत मंत्रालयावर मोर्चा धडकणार
पनवेल / प्रतिनिधी: विविध योजना दाखवून चमकोगिरी करणारे पनवेल महापालिकेचे अधिकारी एकीकडे जुन्या इमारतीला काळ्या कच्चा लावण्यात मग्न असून लोकांच्या पैश्याचा चुराडा नको त्याठिकाणी करीत आहेत. पनवेल महापालिकेत सुसज्ज पत्रकार कक्ष उपलब्ध करून द्यावा याबाबत पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे दिनांक १२ व १३ नोव्हेंबर २०१८ रोजी साखळी उपोषणास सुरूवात केली होती. महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी प्रस्तावित नविन महानगरपालिकेच्या इमारतींमध्ये पञकारासाठी प्रशस्त पञकार कक्ष असेलच तसेच पञकार हाॅल हि असेल असा विश्वास व्यक्त केला तर तात्पुरत्या स्वरूपात जेष्ठ नागरिक संघ हाॅल येथे असलेला महापालिकेचा गाळा किंवा वाल्मिकी नगर येथील समाज मंदिर या दोन ठिकाणची पाहणी करून योग्य त्या ठिकाणी पञकारांसाठी नवीन इमारत होईपर्यंत प्रशस्त पञकार कक्ष उपलब्ध करून देवू असेही त्यांनी त्यावेळी सांगितले होते त्यानुसार उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. मात्र ६ महिने उलटून गेल्यानंतर देखील पत्रकार कक्षाची मागणी पूर्ण होऊ शकली नाही. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर असे समजले कि नवीन इमारत होईपर्यंत किमान ५ वर्षे तरी जातील तोपर्यंत पत्रकारांना गेटबाहेरच उभे राहावे लागेल. याबाबत अनेकदा अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर आमच्या लोकांनाच बसायला जागा नाही असे वारंवार सांगण्यात येत आहे. यामुळे राजे प्रतिष्ठान पनवेल यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन पत्रकार मित्र असोशिएशन सोबत पत्रकार कक्षासाठी " भीक मांगो " आंदोलन पनवेल परिसरात करून पत्रकार कक्षाची आग्रही मागणी केली होती. जागा नाही हे कारण आपल्याला देता असले तरी हे उत्तर पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अपेक्षित नसल्याने राजे प्रतिष्ठान पनवेल - रायगड व पत्रकार मित्र असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ९ जुलै २०१९ रोजी भीक मांगो आंदोलन करण्यात आले होते मात्र पोलिसांनि भीक मागणे हा गुन्हा असल्याने राजे प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते मात्र आजपर्यंत पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार कक्ष पत्रकारांना उपलब्ध करून देण्यासाठी अधिक कष्ट घेतल्याचे दिसून येत नाही. याबाबत वेळोवेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगर पालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, गटनेते परेश ठाकूर, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांना याबाबत लेखी पत्र व समक्ष भेटून चर्चा केली आहे मात्र पनवेल महापालिकेचे अधिकारी व प्रशासन नवीन कंत्राटे, नवीन बांधकामे करण्यासाठी उत्सुक असून त्यांचा गैरकारभार चव्हाट्यावर येऊ नये यामुळे पत्रकार कक्ष देण्यास टाळाटाळ करीत आहेत. यासाठीच राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या नेतृत्वात दिनांक १२ मार्च २०२० रोजी सकाळी ९.०० वाजता पनवेल छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पनवेल ते मंत्रालय याठिकाणी पत्रकार कक्षाच्या मागणीसाठी चालत मोर्चा काढण्यात येणार आहे. पत्रकार कक्ष तात्काळ जुन्या इमारतीमध्ये पत्रकारांसाठी उपलब्ध करून घ्यावा ही प्रमुख मागणी राजे प्रतिष्ठानची असून यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे असे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी सांगितले तर या मोर्चात पनवेलमधील सर्व सामाजिक संस्था, समाजसेवक, नगरसेवक - नगरसेविका, राजकीय पक्ष व इतर संघटना यांनी पाठिंबा देऊन सामील व्हावे असे आवाहन देखील केले आहे.
Comments
Post a Comment