Skip to main content

Posts

Showing posts from February, 2020

पनवेल तालुका पत्रकार मंचाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद शाळांतील मुलांना शुद्धलेखनाची  पुस्तके वाटप

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा     ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त थोर साहित्यिक कुसुमाग्रज अर्थात वि वा शिरवाडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा केला गेला. पनवेल तालुका पत्रकार मंचाच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शुद्धलेखन पुस्तके,निबंधमाला पुस्तके वाटप करून मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.      तालुक्यातील भोकरपाडा येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पनवेल तालुका पत्रकार मंचाच्या वतीने विद्यार्थ्यांना शुद्धलेखन पुस्तके तसेच निबंध पुस्तक माला यांचे वाटप करण्यात आले.यावेळी मुलांना खाऊचे देखील वाटप करण्यात आले. पनवेल तालुका पत्रकार मंचाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, अत्यंत समृद्ध अशा मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपली मराठी भाषा समृद्ध होण्याकरता फार काही वेगळे व मोठे करण्याची गरज नाही. आपण एकमेकांशी मराठीतूनच संवाद साधला तरीसुद्धा पुष्कळ काम होईल. देशातील अन्य राज्यात आपण पाहतो की त

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी रक्तदान शिबीर

    पनवेल(प्रतिनिधी) : थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या ९२ व्या जयंतीचे औचित्य साधून चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) राष्ट्रीय सेवा योजना, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व एम. जी. एम. हॉस्पीटल रक्तपेटी कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०८ ते दुपारी ०३ वाजे पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.            खांदा कॉलनी मधील सीकेटी महाविद्यालयात होणाऱ्या या शिबिराचे उदघाटन महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, संचालक व सभागृहनेते परेश ठाकूर, सचिव डॉ. एस. टी.गडदे, संचालक संजय भगत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. व्ही. डी. ब-हाटे यांनी केले आहे. 

नवलोकहित दृष्टी परिवार यांच्याकडून मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

नवलोकहित दृष्टी परिवार यांच्याकडून मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

साडे बारा टक्के योजनेतील वाटप प्रक्रिया न झालेल्या  इरादित भूखंडांबाबत सिडकोतर्फे सुनावणी

  नवी मुबई : सिडकोच्या नवी मुंबई अधिसूचित क्षेत्रात रायगड जिल्ह्याच्या उरण व पनवेल तालुक्यांतील ज्या प्रकल्पबांधितांना साडे बारा टक्के (12.5%) योजने अंतर्गत भूखंड इरादित करण्यात येऊनही त्यांनी वाटपपूर्व प्रक्रिया आजतागायत पूर्ण केलेली नाही, अशा भूखंडधारकांना याबाबत आपले म्हणणे मांडण्याकरिता दि. 2 मार्च ते 20 मार्च, 2020 या कालावधीत नोडनिहाय सुनावणीचे आयोजन सिडकोतर्फे करण्यात आले आहे. या कालावधीत संबंधित भूधारकांनी आपल्या नोडनुसार दिलेल्या तारखेस सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 या वेळेत सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - 400 614  येथील सातव्या मजल्यावरी साडे बारा टक्के विभाग कार्यालय अथवा तळ मजल्यावरील समस्या निवारण केंद्र येथे उपस्थित राहून आपला खुलासा सादर करावा. सिडकोच्या नवी मुंबई प्रकल्पा अंतर्गत उरण व पनवेल तालुक्यांतील जी गावे नवी मुंबई अधिसूचित क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली होती, अशा गावांतील प्रकल्पबाधित खातेदारांना भूसंपादनापोटी साडे बारा टक्के योजने अंतर्गत भूखंड इरादित करण्यात आले होते. सदर भूखंड इरादित होऊन सुमारे 3 ते 10 वर्षांचा कालावधी लोटला असून अद्यापही काही प्रकल्पबाध

पनवेल महानगर पालिकेत पत्रकारांसाठी सुसज्ज पत्रकार कक्ष तात्काळ मिळण्यासाठी पनवेल ते मंत्रालय चालत मोर्चा

राजे प्रतिष्ठानतर्फे १२ मार्चला चालत मंत्रालयावर मोर्चा धडकणार                              पनवेल / प्रतिनिधी: विविध योजना दाखवून चमकोगिरी करणारे पनवेल महापालिकेचे अधिकारी एकीकडे जुन्या इमारतीला काळ्या कच्चा लावण्यात मग्न असून लोकांच्या पैश्याचा चुराडा नको त्याठिकाणी करीत आहेत. पनवेल महापालिकेत सुसज्ज पत्रकार कक्ष उपलब्ध करून द्यावा याबाबत पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे दिनांक १२ व १३ नोव्हेंबर २०१८ रोजी साखळी उपोषणास सुरूवात केली होती. महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी प्रस्तावित नविन महानगरपालिकेच्या इमारतींमध्ये पञकारासाठी प्रशस्त पञकार कक्ष असेलच तसेच पञकार हाॅल हि असेल असा विश्वास व्यक्त केला तर तात्पुरत्या स्वरूपात जेष्ठ नागरिक संघ हाॅल येथे असलेला महापालिकेचा गाळा किंवा वाल्मिकी नगर येथील समाज मंदिर या दोन ठिकाणची पाहणी करून योग्य त्या ठिकाणी पञकारांसाठी नवीन इमारत होईपर्यंत प्रशस्त पञकार कक्ष उपलब्ध करून देवू असेही त्यांनी त्यावेळी सांगितले होते त्यानुसार उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. मात्र ६ महिने उलटून गेल्यानंतर देखील पत्रकार कक्षाची मागणी पूर्ण होऊ शकली नाही. या

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात 7000 जागांसाठी भरती

  महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात  भरती २०२० Maharashtra State Security Corporation (MSSC), Maharashtra Security Force (MSF), Maha Security Recruitment 2020 (Maha Security Bharti 2020/MSF Bharti 2020) for 7000 Security Guard (Male)  Total: 7000 जागा पदाचे नाव: सुरक्षा रक्षक (पुरुष) शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण शारीरिक पात्रता:  पुरुष उंची170 से.मी वजन60KG छाती79 सेमी व फुगवून  5 सेमी जास्त शारीरिक चाचणी 1600 मीटर धावणे [50 गुण]  वयाची अट: 18 ते 28 वर्षे (जन्म 31 जानेवारी1992 ते 31 जानेवारी 2002 दरम्यान) नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र Fee: ₹250/-    Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मार्च 2020 (05:00 PM)

मराठी भाषादिनाचे औचित्य साधुन कोंकण भवन  येथे कार्यशाळेचे आयोजन संपन्न 

  नवी मुंबई : दि. २६ रोजी  माहितीच्या क्षेत्रात सतत बदल होत आहेत. आजच्या युगात कॅमेरा नष्ट होत असुन मोबाईल युग सुरु झाले आहे . ही  एक नवीन क्रांती असुन या बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन कामकाजात करुन माहिती विभागाने अद्ययावत व्हावे असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ दिलीप पांढरपट्टे यांनी केले.     कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने  कोकण भवन येथे मराठी भाषादिनाचे औचित्य साधुन आयोजित मोबाईल पत्रकारिता या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन महासंचालक डॉ दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर उपसंचालक डॉ गणेश मुळे, ज्येष्ठ पत्रकार सुनिल ढेपे, वरिष्ठ पत्रकार हर्षल भदाणे उपस्थित होते.       यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ पांढरपट्टे म्हणाले काळाची पाउले ओळखुन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय तंत्रज्ञानाचा दैनंदिन कामकाजात  वापर करीत आहे. सध्याचे मोबाईलचे युग आहे. मोबाईल पत्रकारितेचे महत्त्व लक्षात घेऊन  कोकण विभागीय कार्यालयाने यासाठी घेतलेला पुढाकार  अतिशय अभिमानास्पद आहे.       मोबाईल हा माहिती विभागाचा साथी बनला आहे. जिल्हा

बेकायदेशीरपणे गोळीबार करणाऱ्या भाजपा नेता पंढरीनाथ फडके याला जिल्ह्यातून हद्दपार करा

राजे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी.                                                            पनवेल / प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील विहिघर गावामध्ये दिनांक २० फेब्रुवारी २०२० रोजी क्रिकेटच्या नाईट मॅचेस दरम्यान भाजपाचा नेता पंढरीनाथ फडके यांच्या रॉयल एंट्रीला त्यांनी स्वतः पोलिसांच्या मते नकली मात्र आमच्या मते खऱ्या बंदुकीने यूपी बिहार स्टाईलने गोळ्या झाडल्या. आपण किती मोठे गुंड आहोत व कायदा आपले काहीही करू शकणार नाही हे मनात ठासून अशा प्रकारची कृत्य पंढरीनाथ फडके याने केली आहेत. अशा प्रकारच्या माणसाचा फक्त गावालाच नव्हे तर तालुक्याला व जिल्ह्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत आम्ही खांदेश्वर पोलीस ठाण्याशी माहिती घेण्यासाठी संपर्क केला असता वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी चौकशी होण्याच्या आधीच सदर बंदूक हि नकली असल्याचे सांगितले त्यानंतर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर नवी मुंबई आयुक्तालयातील मध्यवर्ती गुन्हे शाखा कक्ष २ यांच्याकडे तपास सुपूर्द करून पंढरीनाथ फडके यास ताब्यात घेतले असल्याचे समजले. मात्र खांदेश्वर पोलिसांची भूमिका याबाबतीत संशयास्पद

खारघर सिडको कार्यालयात भाजपाचे ठिय्या आंदोलन

पनवेल : खारघरमधील विविध प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी सोमवार भाजपच्या वतीने खारघर येथील सिडको कार्यालयात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. आदी समस्या सोडवा अन्यथा येथुन हलणार नाही . असा पवित्रा घेत भाजप पदाधिकाऱ्यांनी सिडको कार्यालयातच ठिय्या मांडला . पावसाळ्यानंतर मैदान व उद्यानातील  गवत कापणे काम , ड्रेनेज   लाईन साफ करणे , पदपथावर तुटलेली झाकणे , दिवाबत्ती या प्रश्नाकडे सिडकोचे अधिकारी डोळेझाक करतात . सिडकोच्या झोपलेल्या प्रशानाला जागे करण्यासाठी खारघर भाजपाचे सर्व पदाधिकारीही सिडको कार्यालयात शिरले   व तसेच अधिकाऱ्यांना धारेवर धरले .     यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल , स्थायी समिती सभापती प्रविण पाटील , नगरसेवक नरेश पाटील , महिला मोर्चा अध्यक्षा वनिता पाटील , नगरसेविका आरती नवघारे , हर्षदा उपाध्याय , अनिता पाटील व बिना गोगारी  याच्यासह पदाधिकारी समीर कदम , संजय शिंदे , गुरुनाथ म्हात्रे , साजिद पटेल , मोना अडवाणी , गीता चौधरी , शत्रुघ्न काकडे आदी उपस्थित होते.      

घाटी हॉटेल आग्रहाचे निमंत्रण

  पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश खास करुन सातारा, सांगली, सोलापुर- कोल्हापुर म्हटलं कि, डोळ्यासमोर येतं ते *घाटी गावरान मटन - चिकन* हीच महाराष्ट्राची घाटावरची झणझणीत ठसकेदार चमचमीत चव घेऊन आम्ही येत आहोत :-   *हॉटेल घाटी*  घाटावरील माणसांची आवड असणारे *गावरान चिकन मटनाचे घाटी हॉटेल* चे उद्घाटन *IPS व पोलीस उपायुक्त श्री अशोक दुधे साहेब आणि घाटावरील १५ क्लास वन व त्यावरिल अधिकाऱ्यांच्या सन्माननीय उपस्थितीत* होत आहे, याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.  तरी घाटावरील अधिकाऱ्यांच्या व  *eMpower* टिमच्या सन्माननीय उपस्थितीत रविवार दि. २३ फेब्रुवारी रोजी उद्घाटन होणाऱ्या, घाटी हॉटेलच्या उद्घाटनप्रसंगी, खारघर,कळंबोली, कामोठे, पनवेल, नवीमुंबई परिसरातील, सर्व रहिवाशांनी आवर्जून उपस्थित राहून, एका घाटी उद्योजकास साथ-प्रेरणा-आशीर्वाद  द्यावा ही नम्र विनंती!!!! ठिकाण :- हॉटेल घाटी,छत्रपती शिवाजी महाराज चौक, से. १२ खारघर. टिप:- उदघाटनाच्या निमित्ताने हजर राहणार्‍या २००० रहिवाशांसाठी खारघर मधिल *सुप्रसिद्ध अशा घाटी मिसळ* ची सोय सकाळी ९ ते ११.३० दरम्यान केली आहे.  सर्वानी नाष्टा न करता या उदघाटणास उपस

तळोजामध्ये एकाच कुटुंबांतील चौघांचा मृतदेह आढळला

पनवेल : तळोजा फेज वन येथे सेक्टर ९ मधील    शिव कॉर्नर सोसायटीत राहणाऱ्या चौघांचे मृतदेह आढळले आहेत. यात पती-पत्नी आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब येथे भाडेत्तवावर राहत होते. पतीने पत्नीसह आपल्या दोन लहान मुलांची हत्या करुन स्वत: गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे मृतदेह गेल्या काही दिवसांपासून फ्लॅटमध्ये पडून होते, अशी माहिती पुढे येत आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. 

मुर्बी गावातील क्रिकेट प्रेमींमार्फत आयोजित "मुर्बी प्रीमियर लीग  धमाका २०२० 

  खारघर : मुर्बी प्रीमियर लीग २०२०" या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन  पनवेल महानगरपालिकेचे मा.सभापती (प्रभाग समिती अ) तथा नगरसेवक मा.श्री.अभिमन्यू धर्मा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिवसेना खारघर शहर प्रमुख मा.श्री.शंकरशेठ ठाकूर, भाजप पनवेल तालुका चिटणीस श्री.वासुदेव पाटील, श्री.काशिनाथ घरत, आदी मान्यवर उपस्थित होते. त्यावेळची काही क्षणचित्रे...

दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि ची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक २०२० ते २०२५ 

रयत पॅनलच्या सर्व उमेदवारांना रिक्षा या निशाणीवर शिक्का मारून प्रचड बहुमताने निवडून करा

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने  थोर विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांना 'स्व. जनार्दन भगत स्मृती पुरस्कार' जाहीर

              पुरस्काराचे स्वरूप; पाच लाख रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र     पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान व गोरगरीब कष्टकऱ्यांचे दृष्ट नेते थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन भगत यांचा जयंती सोहळा व स्व. जनार्दन भगत स्मृती पुरस्कार सोहळा शनिवार दिनांक २९ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ११ वाजता खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज (दि. २०) खांदा कॉलनी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.         यावेळी पुढे माहिती देताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले कि, स्व. जनार्दन भगत यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रथमच देण्यात येणाऱ्या या पुरस्काराने रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन, थोर विचारवंत आणि चळवळींचे महामेरू असलेले प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना समारंभपूर्वक सन्मानित करण्यात येणार आहे. रक्कम पाच लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून राज्याचे उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप

शिवजयंतीदिनी तिने घेतला किल्ले हडसर वर शेवटचा श्वास

काल शिवजयंती सगळीकडे उत्साहात साजरी होत होती तर नियती कु.सिध्दी सुनील कामठे या २० वर्षीय तरूणीशी काही वेगळाच खेळ खेळत होती. तीला हे ठाऊकच नव्हते की तीची ही शेवटची शिवजयंती असेल. सिध्दि एस वाय ची विद्यार्थिनी असून किल्ले हडसर वर सह्याद्रीक्कर्स फाऊंडेशन तर्फे स्वछता अभियान राबवून शिवजयंती साजरी करण्यासाठी आपल्या सोबत असलेल्या ३४ सदस्यांबरोबर चिंचपोकळी मुंबई येथून आली होती. सकाळी ९ वा. किल्ले हडसरच्या खिळ्याच्या वाटेने किल्ले हडसर वर स्वच्छता करत पोहचायचे हा त्यांचा मानस होता. अनेक ट्रेकचा अनुभव असलेली सिध्दी हातात श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भगवा घेऊन लिड करत होती. सोबतीला पल्लवी होती. एक एक करत ती पल्लवी सोबत खिळ्याची वाट चढूत होते. खिळ्याची चढाई करून आता ती तटबंदीची भिंत ओलांडणार होती. हातात शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतीमा असलेला भगवा स्वत:कडे ठेवत प्रतीमेला पुजन करण्यासाठी असलेली पिशवी ती पल्लवीकडे देताच तीचा पाठीमागे अचानक तोल गेला. व क्षणात हातात भगवा झेंडा घेऊन ती घरंगळत खाली गेली. क्षणात होत्याचं नव्हतं होतं व सिध्दी वरून ४५० फुट खाली कोसळते. ती वेळ होती

अलिबाग तालुक्यात होणार मेडिकल कॉलेज अशी माहिती खासदार सुनिल तटकरे यांनी दिली

  अलिबाग : काही वर्षांपासून प्रलंबित राहिलेला मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा झाला असून अलिबाग तालुक्यात मेडिकल कॉलेज उभे राहणार आहे. त्यासाठी जागेचा प्रश्न येत्या आठ-दहा दिवसांत सुटेल, अशी माहिती रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. अलिबागेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खा. सुनील तटकरे बोलत होते. जिल्ह्यात होणार्‍या विकास कामांबाबत सुरू असलेल्या पाठपुराव्याबाबत त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. मेडिकल कॉलेजचा विषय हा भिजत घोंगडे होऊन पडला होता. जागेअभावी हा विषय मागे पडला. दरम्यान, या विषयाला पुन्हा एकदा चालना मिळाली आहे. 75 मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव असून महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव सादर केल्यास त्याला परवानगी मिळेल, अशी ग्वाही केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिल्यानंतर मेडिकल कॉलेजसाठी प्रयत्न सुरू झाले. दरम्यान, जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हा रुग्णालय असल्याने त्याला लागूनच मेडिकल कॉलेज उभे करावे लागेल, असा राज्यशासनाचा दंडक आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यात जागेचा शोध घेण्यात आला. येत्या आठ-दहा दिवसांत हा प्रश्न मार्गी लागेल, असे खासद

साताऱ्यात एटीएम फोडण्याचा दोन ठिकाणी प्रयत्न

सातारा : शहरातील मध्यरात्री दोन एटीएम फोडण्याचा  भर वस्तीतील  प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञातांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.     याबाबत पोलिसांनी अशी माहिती दिलेली की  मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मंगळवार पेठेतील स्टेट बँकेच्या एटीएमचे तिजोरीचे कवर काढले. त्यानंतर त्याचे मॉनिटर फोडून त्याचे नुकसान केले. मात्र, चोरट्याला पैसे काढता आले नाहीत. तसेच राजधानी टॉवर्समधीलही बँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला.    या ठिकाणीही चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. भर वर्दळीच्या ठिकाणी दोन एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. एटीएमची सुरक्षा रामभरोसी झाली आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी राजधानी टॉवर येथील एटीएमला सुरक्षा रक्षक नेमण्यात आला होता. मात्र, सध्या या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने अशा प्रकारच्या घडत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, दोन्ही एटीएममधील सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले असून, दोन ते तीनजण सीसीटीव्हीत दिसत आहेत. सीसीटीव्ही फूटेजवरून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

करदात्यांना आयकर विभागातील कर्मचाराने आयकर आयुक्तांची खोटी सही करून बजावल्या नोटिसा 

  सातारा : अतिरिक्त आयकर आयुक्तांच्या खोट्या सह्या करून ११ करदात्यांना नोटीस बजावणाऱ्या आयकर विभागातील कर्मचाऱ्यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रसाद सुहास कसबेकर (रा. कृष्णानगर, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या आयकर कर्मचाऱ्यांचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, साताऱ्यातील सायन्स कॉलेजसमोर आयकर कार्यालय आहे. या कार्यालयामध्ये प्रसाद कसबेकर हा काम करतो. १२ डिसेंबर २०१९ रोजी कसबेकरने ११ करदात्यांना नोटीस बजावल्या. त्या नोटीसावर अतिरिक्त आयकर आयुक्त के. के. ओझा यांच्या खोट्या सह्या केल्या. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आयकर निरीक्षकांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.  

विवाहित पुरुषाशी लग्न लावून महिलेची फसवणूक

  मालेगाव मध्य : विवाहित पुरुषाशी महिलेचा विवाह लावून तिला मारहाण व दमदाटी करीत तलाकच्या कागदपत्रांवर बळजबरीने सह्या घेत परस्पर पीडित महिलेचा पुन्हा दुसरा निकाह लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली. सदर इसमासह त्याला मदत करणाऱ्या महिलेविरोधात रमजानपुरा पोलिसात पीडित महिलेने तक्रार दिली. शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निकाह लावून महिला व परराज्यातील पुरुषांची फसवणूक करणारी टोळी शहरात कार्यरत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून रॅकेटचा पर्दाफाश करावा, अशी मागणी नश्र फाउण्डेशनतर्फे उर्दू मीडिया सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. फिर्यादीत म्हटले आहे की, परभणीतील एका मुलीचा निकाह ३१ जानेवारीस संशयित शेख इमरान शेख आबीद रा. सलमान फारसी मशीदजवळ, रमजानपुरा याच्याशी झाला. परभणीतून मनमाडला पोहोचताच संशयित इमरानने पीडित महिलेस मध्यस्थ असलेल्या शबाना नुरअली शाह रा. सलीमनगर हिच्याकडे सोडून निघून गेला. संशयित महिला शबानाने पीडितेस तिच्या घरी आणले. इमरानचे लग्न झाले असून, त्यास दोन अपत्ये आहेत. दोन दिवसानंतर इमरान आला. शबाना व इमरान याने पीडितेस रिक्षाने एका कार्यालयात

दोन वर्षात आॅनलाईन  ८५ जणांना गंडा

  जळगाव : तंत्रज्ञानात जशी दिवसागिणक भर पडत आहे, अगदी त्याच पध्दतीने याच तंत्रज्ञानाचा उपयोग करुन आॅनलाईन फसवणूक असो की गंडा घालणे याचे प्रकार अधिक वाढत चालले आहेत. २०१८ ते २०१९ या दोन वर्षात सायबर पोलिसांकडे आॅनलाईन फसवणुकीचे ८५ गुन्हे दाखल झाले असून त्यातील फक्त २९ गुन्हे उघडकीस आले आहेत. ५६ गुन्हे अद्यापही प्रलंबित आहेत. सर्वच गुन्ह्यांमधील आरोपी परप्रांतीय असल्याने तपासात अडचणी निर्माण होत आहेत. जिल्ह्यात सायबर पोलीस स्टेशनची निर्मिती झाल्यापासून कागदोपत्री ८५ गुन्हे दाखल झाले आहेत. प्रत्यक्षात असे अनेक गुन्हे घडले आहेत, की त्याची नोंद झालेली नाही. मात्र काही प्रकरणात तक्रार अर्जावरच तक्रारदाराला रक्कम परत मिळाल्याने गुन्हे दाखल झालेले नाहीत. २१ सप्टेबर २०१८ ला पहिला गुन्हा तत्कालिन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्या कार्यकाळात १५ आॅगस्ट २०१७ रोजी सायबर लॅबची निर्मिती झाली. तत्कालिन पालकमंत्री स्व.पांडूरंग फुंडकर यांच्याहस्ते या लॅबचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर या लॅबचे सायबर पोलीस ठाण्यात निर्मिती झाली. जळगावला पहिला गुन्ह २१ सप्टेबर २०१८ रोजी दाखल झाला. टॉप टेन गुन्हे उघड प

हातचलाखीने करून  अंगठी चोरणारी मॉडेल  गजाआड

              पुणे : उच्च राहणीमान असलेली एक तरुणी ज्वेलर्सच्या दुकानात आली. तिने काही दागिने पाहिले व त्यानंतर पसंत नसल्याचे सांगत निघून गेली. तिच्याकडे पाहून कोणीही ही चोरी करेल, असे वाटले नव्हते. पण जेव्हा सीसीटीव्हीची पाहणी करण्यात आली तेव्हा या तरुणीने १० ग्रॅम वजाच्या ५० हजार रुपये किंमतीच्या २ सोन्याच्या अंगठ्या चोरुन नेल्याचे आढळून आले. गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने या तरुणीला ताब्यात घेतले तेव्हा ती मॉडेल असल्याचे समाेर आले.  स्रेहलता ऊर्फ स्रेहल ऊर्फ साक्षी पाटील (वय २५, रा़ कोथरुड) असे तिचे नाव आहे. तिला एनआयबीएम रोडवरील क्लोव्हर प्लाझा मॉलमधून पोलिसांनी ताब्यात घेतले. लष्कर भागातील सेंट्रल स्ट्रीटवरील खरी पेढी ज्वेलर्समध्ये ही तरुणी २० जानेवारी रोजी आली होती. खरेदीचा बहाणा करुन तिने दोन अंगठ्या चोरुन नेल्या होत्या. लष्कर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरु होता. पोलीस नाईक मोहसीन शेख यांना हा गुन्हा स्रेहलता पाटील हिने केल्याची माहिती मिळाली. बातमीची सत्यता पडताळून पाहत असताना स्रेहलता ही एनआयबीएम रोडवरील क्लोव्हर प्लाझा म

पंढरपूरमध्ये शालेय मुलीने शिक्षकांनी मारहाण केल्याने विष प्राशन केले

      पंढरपूर : परीक्षेत कमी गुण मिळाल्याने आणि वर्गात गोंधळ घातल्याने शिक्षकांनी मारहाण केल्यामुळे   पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे एका १३ वर्षांच्या मुलीने विष प्राशन करण्याचा प्रकार  घडला. याप्रकरणी तिने दिलेल्या तक्रारीनुसार पंढरपूर तालुका पोलिसांनी संबंधित शाळेतील दोघा शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.     कांचन तानाजी घटुकडे (रा. घटुकडे वस्ती, गुरसाळे) असे या मुलीचे नाव आहे. गुरसाळे गावच्या श्री विठ्ठल प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला असून या प्रकरणी या शाळेतील डोंगरे व सय्यद या दोघा शिक्षकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या कांचन घटुकडे हिला शाळेतील नवमाही परीक्षेत कमी गुण मिळाले होते. त्यामुळे तिच्यावर शिक्षक रागावले होते. परीक्षेत कमी गुण मिळाले आणि वर्गात नेहमीच गोंधळ घालते म्हणून डोंगरे व सय्यद या दोघा शिक्षकांनी कांचन हिला मारहाण केली. यात अपमान वाटल्याने कांचनने घरी आल्यावर विष प्राशन केले. डाळिंब बागेत फवारणी केले जाणारे विषारी औषध प्राशन केले. तिला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर तिने

पंजाबराव देशमुख विद्यापीठात २१ विदेशी विद्यार्थ्यांचे कृषी शिक्षण धडे 

विदर्भातील संपूर्ण ११ जिल्हय़ांचे कार्यक्षेत्र असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात २१ विदेशी विद्यार्थी कृषी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. या विद्यार्थ्यांनी पदवी, पदव्युत्तर व आचार्य पदवीसाठी प्रवेश घेतला आहे. आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष पूर्ण करणाऱ्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामधून गत ५० वर्षांत ४८ हजार कृषी पदवीधर तयार झाले आहेत. कृषी शिक्षण, संशोधन व विस्तारात विद्यापीठाचे कार्य महत्त्वपूर्ण ठरत आहे. विदर्भाला शेतीची समृद्ध परंपरा लाभली आहे. परंतु गत दोन दशकापासून शेतकरी आत्महत्यांची काळी छाया विदर्भातील कृषी क्षेत्रावर पडली आहे. या परिस्थितीतही  कृषी विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांचा कल सातत्याने वाढत आहे.  २० ऑक्टोबर १९६९ रोजी या विद्यापीठाची स्थापना झाली. विद्यापीठांतर्गत १० घटक महाविद्यालये, दोन संलग्न महाविद्यालये व २६ कायम विना अनुदानीत खासगी कृषी महाविद्यालये असून या मार्फत दरवर्षी एकूण ३६६१ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यामध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी ३१९५, पदव्युत्तर अभ्याक्रमाच्या ४१० व आचार्य पदवी अभ्यासक्रमाच्या ५६ जागांचा समावेश आहे. ‘इंडो-अफगाण, इंडो-अफ्रिका व

उत्तरप्रदेशमध्ये तरुणीवर लग्नाआधी बलात्कार केला                       

                                       उत्तरप्रदेश : एका तरुणीवर बलात्कार करून तिचा व्हिडिओ बनवल्याचा धक्कादायक प्रकार बरेलीमध्ये  समोर आला आहे. ज्यावेळी तरुणीचे लग्न झाले त्याच्या दुसऱ्याच दिवशी आरोपीने बलात्काराचा व्हिडिओ तिच्या पतीला पाठवल्याने हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर पीडितेच्या पतीने तिला घरातून हाकलून दिले आहे.      लग्नाच्या काही दिवस अगोदर पीडित तरूणी तिच्या मैत्रीणीच्या घरी गेली होती. त्यावेळी मैत्रिणीच्या भावाने चहामध्ये गुंगीचे औषध मिसळून तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचा व्हिडिओ देखील बनवला. पीडितेचे लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिच्या पतीच्या मोबाईलवर अश्लिल व्हिडिओ आला. तो बघताच संतप्त पतीने तिला घरातून हाकलून दिले. पतीने घरातून काढल्यानंतर पीडितेने सिरोली पालीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली, मात्र तेथील अधिकाऱ्याने आरोपीला अशांतता पसरवल्याच्या आरोपाखाली दंडात्मक कारवाईकरून त्याला सोडून दिले. त्यामुळे पीडितेने याची तक्रार पोलीस अधिक्षक मुनिराज यांच्याकडे केली. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत, अधीक्षकांनी चौकशी करून सरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सोम प्रकाश यांना

जय संताजी तेली समाज मंडळाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा  शेकडो समाजबांधवांची उपस्थिती   

पनवेल(प्रतिनिधी) पनवेल शहर त्याच बरोबर तालुक्यातील इतर ठिकाणी विखुरले गेलेले तेली समाज बांधव एकत्र येऊन स्नेहसमारंभ मोठ्या उत्साहात पनवेल येथील तेली नाका येथील शनी मंदिरात जय संताजी तेली समाज मंडळ पनवेल, पनवेल तेली समाज युवा विचार मंच,जिजाऊ महिला मंडळ पनवेल यांच्या वतीने पार पडला. या वेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार समारंभाला मोठ्या प्रमाणात जेष्ठ नागरिक ,महिला आणि लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते .         कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात करण्यात आली .  त्या नंतर तेली समाजाचे संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या मूर्तीला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या वेळी जय संताजी तेली समाज मंडळाचे अध्यक्ष सतीश वैरागी यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि, तेली समाज आणि संताजी महाराज यांचे अतूट नाते आहे . आज समाजाची ओळख संताजी महाराजांमुळे असून तेली समाजाने नेहमी एकजुटीने राहिले पाहिजे . त्याच बरोबर समाजातील मुलांना प्रोत्साहन मिळण्याकरिता नेहमी समाजाने पुढाकार घेतला पाहिजे असल्याचे त्यांनी म्हंटले .त्याच बरोबर स

बँक ऑफ महाराष्ट्रने उत्साहात साजरी केली छत्रपती शिवाजी महाराज जयंती

बँकिंग सोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवीन पनवेल शाखेने मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली. सर्व प्रथम बँकेचे सन्माननीय ग्राहक व डी.एस.ए. मा. प्रदीपराव देशमुख यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस हार अर्पण करण्यात आले व सर्व उपस्थितांनी दोन्ही महामानवास पुष्प अर्पण करून मानाचा मुजरा केला. यावेळी बँकेचे शाखा प्रबंधक, मा. विजयकुमार पाटील, प्रबंधक, मा. सौ. शैलजा ठाकेकर, विशेष सहायक, अरविंद मोरे व दफ्तरी वामनराव गायकवाड उपस्थित होते. या प्रसंगी बँकेचे विशेष सहायक, मा. अरविंद मोरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरण केले की, प्रत्येकाच्या अंगात उत्साह व नव चैतन्य संचारते. हे केवळ छत्रपतींच्या अंगी असलेल्या अष्टपैलू गुणामुळे व कर्तृत्व मुळेच. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. तसेच ते सर्वांचे उद्धारकर्ता सुद्धा होते. ते महिलांचा सन्मान करणारे होते. कोणी महिलांचा अपमान केला तर ते कठोर शासन  करणारे होते आणि म्हणून त्या काळात महिलांवर अत्याचार होत नसत. छत्रपती शिवाजी महाराज हे

युथ फोरम सोशियल असोसिएशनच्या वतीने विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार

पनवेल : सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा, राजकीय, साहित्य व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा युथ फोरम सोशियल असोसिएशन यांच्या वतीने पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने देवीचापाडा याठिकाणी आयडियल पब्लिक स्कूलच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न नुकताच संपन्न झाला.         यूथ फोरम सोशियल असोसिएशन यांच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम राबविले जातात. समाजातील वंचित व दुर्बल घटकासाठी निस्वार्थपणे काम करणारी अनेक लोक आहेत. समाजासाठीच त्यांचे योगदान अतिशय मोलाचे व महत्त्वाचे आहे. या सामाजिक बांधिलकी म्हणून या मान्यवरांचा सत्कार करण्यासाठी आपण हा सोहळा आयोजित करत असतो, अशी माहिती यावेळी संस्थेचे अध्यक्ष केवल गायकवाड यांनी यावेळी दिली. पुरस्काराने सन्मानित आलेल्या गुणवंताची नावे: पत्रकारिता: मयूर तांबडे, केवल महाडिक, गणपत वारगडा सामाजिक क्षेत्र: डि. के. भोपी, नरेंद्र भोपी, विजय कदम, सलमान गांगू, प्रशांत जाधव शैक्षणिक: यशवंत बिडे, किशोर पाटील, संदीप काठे राजकीय: विजय पव

खेलो इंडिया युथ गेम' स्पर्धेत पनवेलच्या स्वस्तिकची चमकदार कामगिरी

              पनवेल :  राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने सर्वोत्कृष्ठ कामगिरी करणारी आणि ज्युनिअर गटातील जागतिक मानांकनात सहाव्या क्रमांकावर असलेल्या टेबल टेनिस  पटू स्वस्तिका घोष हिने आसाम येथे झालेल्या 'खेलो इंडिया युथ गेम २०२०' राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आणखी एक चमकदार कामगिरी केली आहे.       या कामगिरीबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, तसेच रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते संजय कडू यांनी आज (दि. १६) स्वस्तिकाचे अभिनंदन करून तीला पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.         केंद्र शासनाच्या निर्देशनानुसार दरवर्षी विविध क्रीडा प्रकार असलेल्या 'खेलो इंडिया युथ गेम' या स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्या अनुषंगाने आसाममध्ये हि स्पर्धा पार पडली.  या स्पर्धेतील कनिष्ठ एकेरी स्पर्धेत रजत तर दुहेरी गटात कांस्य पदक पटकाविले तसेच महाराष्ट्राच्या संघाने टेबल टेनिसमध्ये एकूण ९ पदके जिंकून या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले त्यामध्ये स्वस्तिक

मुर्बी गावातील समस्या त्वरित सोडवण्याचे खासदार मा.श्री.श्रीरंग बारणे यांचे शंकरशेठ ठाकूर यांना आश्वासन

खारघर :२१ व्या शतकातील आधुनिक शहर म्हणून खारघर शहराची ख्याती जगभर पसरत आहे. मोठ मोठे प्रकल्प येथे राबविले जात आहेत. खारघर शहर विकसित करण्यासाठी येथील भूमी पुत्रांनी आपल्या जमिनी सिडको महामंडळाला कवडीमोल भावाने दिल्या. यामधून सिडको महामंडळाने यामधून गडगंज संपत्ती मिळविली. पण ज्या भूमिपुत्रांना मुळे हे मिळविले त्याचा विसर सिडको महामंडळाला पडला. सिडको महामंडळ आणि पनवेल महानगर पालिकेने प्रकल्पग्रस्त गावांकडे दुर्लक्ष केले आहे. आज मुर्बी गावातील समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ *शहरप्रमुख शंकरशेठ ठाकूर* यांच्या सोबत *विभाग प्रमुख मनेश पाटिल* उपविभाग प्रमुख दत्ता दळवी, , शाखाप्रमुख सचिन पाटील, युवासेना विभाग अधिकारी प्रेम ठाकूर आणि पूजन ठाकूर यांनी खासदार बारणे साहेब यांची भेट घेवून *१.मुर्बीगावातील रस्त्याचे कॉंक्रीटीकण* *२.तलावाचे सुशोभीकरण* *३. समाज हॉल बांधणे* याचे निवेदन देण्यात आले. खासदार साहेबांनी ही बाब गांभीर्याने घेवून रस्त्याचे आणि तलावाचे काम त्वरित करण्याचे आश्वासन दिले. गावातील समस्या त्वरित सोडवण्याचे खासदार मा.श्री.श्रीरंग बारणे यांचे शंकरशेठ ठाकूर यांना आश्वासन २१ व

भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर 

पनवेलः भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्ह्याची कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जाहीर केली आहे.          भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणूका पार पडल्या. त्यामध्ये बुथ अध्यक्ष पासून ते राष्ट्रीय अध्यक्षांची निवड नुकतीच करण्यात आली आहे. भाजपाच्या संघटनात्मक दॄष्टीने रायगड जिल्हयाचे दोन जिल्हे करण्यात आले. त्याप्रमाणे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पक्षाने जबाबदारी दिली.  त्यांनी त्यांच्या कार्यकारिणीची घोषणा केली असून जिल्हा उपाध्यक्षपदी वसंत भोईर, रामदास ठोंबरे, सुनिल घरत, श्रीकांत पुरी, विठ्ठल मोरे, के. के. म्हात्रे, प्रल्हाद केणी, निळकंठ घरत, जिल्हा सरचिटणीसपदी श्रीनंद पटवर्धन, दीपक बेहेरे, विनोद साबळे, संघटन सरचिटणीसपदी अविनाश कोळी, चिटणीसपदी शरद कदम, रमेश मुंडे, रमेश नायर, गीता चौधरी, ऍड. आशा भगत, कोषाध्यक्षपदी सनी यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.         महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी अश्विनी पाटील, युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी मयुरेश नेतकर, अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रकाश बिनेदार, किसान मोर्चाच्य

पनवेल शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना आणि रिक्षा थांबे धोरण

      महापालिकेत सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या पुढाकाराने शनिवार ( दि .१५ ) रोजी बैठक पार पडली. यावेळी उपमहापौर जगदिश गायकवाड, स्थायी समिती सभापती प्रविण पाटील, नगरसेवक नितीन पाटील, विकास घरत, पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते, आरटीओचे अधिकारी किरण खोत, शहर अभियंता कटेकर, वंदे मातरम संघटनेचे रवी नाईक आदी उपस्थित होते.  

पनवेल महानगरपालिका - निवडणूक विभाग लोकशाही पंधरवडा

२०२० निमित्ताने बचतगट, व्यवसायिक आणि उद्योजक यांचे चर्चासत्र व परिचय मेळावा पनवेल महानगरपालिकाने उद्योजकांसाठी बनवलेले Panvel NULM CLC मोबाइल एप्लिकेशन संदर्भित माहिती देण्यासाठी महिला बचत गटांच्या प्रतिनिधींची खारघर येथील युवा सेन्टर येथे आज मिटींग घेण्यात आली. लक्ष्यपूर्ति फेडरेशनच्या पुढाकारातून Altruistic Foundation Trust and Yuva Center च्या संयुक्त सहाय्याने ह्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात महिला बचत गटांच्या उत्पादनांना प्रदर्शन व विक्री ची संधीही उपलब्ध करून देण्यात आली.

सिडकोच्या मालमत्ता हस्तांतरणविषयक सेवेची माहिती देणारी‘ट्रान्सफर मेड इझी’ पुस्तिका ऑनलाइन नि:शुल्क उपलब्ध 

सिडकोच्या वसाहत विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध सेवा या नोव्हेंबर, 2019 पासून पूर्णत: ऑनलाइन करण्यात आल्यापासून हस्तांतरणविषयक सेवेची माहिती देणारी ‘ट्रान्सफर मेड इझी’ ही पुस्तिकाही आता ऑनलाइन व कोणतेही शुल्क न आकारता अर्जदारांकरिता सिडकोच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.  नवी मुंबईतील नागरिकांना वसाहत विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध सेवा जसे, वारस/मालमत्ता  हस्तांतरण, तारण ना-हरकत प्रमाणपत्र, विविध प्रकारच्या परवानग्या, इ. या अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक रीतीने मिळाव्यात व नागरिकांना त्यासाठी वारंवार सिडको कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने दि. 1 नोव्हेंबर, 2019 पासून या सेवा पूर्णत: ऑनलाइन डिजिटल माध्यमातून देण्याचा निर्णय सिडको महामंडळातर्फे घेण्यात आला आहे. तसेच या सेवांशी संबंधित अर्ज करणे, शुल्क भरणे, कागदपत्रे सादर करणे, नागरिकांना प्रमाणपत्रे, परवानग्या, आदेश पाठवणे या प्रक्रियाही ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. ऑनलाइन सेवा सुरू केल्यानंतरही योग्य माहिती अभावी नागरिकांना अडचणी येऊ नयेत याकरिता हस्तातंरणविषयक सेवेची माहिती देणाऱ्या या योजना पुस्ति

सिडको सोडतीतील सदनिकांचे वाटपपत्र रद्द झालेल्या अर्जदारांना विलंब शुल्कासह हफ्ते भरण्याची संधी

   सिडको गृहनिर्माण योजनेतील ज्या विजेत्या अर्जदारांची सदनिकांचे हफ्ते वेळेत न भरल्याच्या कारणास्तव त्यांची वाटपपत्रे रद्द करण्यात आली होती अशा सर्व अर्जदारांना विलंब शुल्कासह सदनिकांचे हफ्ते भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित अर्जदार दिनांक ३० जून २०२० पर्यंत त्यांच्या सदनिकांचे हफ्ते विलंब शुल्कासह भरू शकतात.      सिडकोच्या सोडतीत सदनिकांचे वाटपपत्र प्राप्त झाल्यानंतर अर्जदार त्यात नमूद वेळापत्रकानुसार हफ्ते भरण्यास असमर्थ ठरल्यास त्याचे सदनिकेसाठीचे वाटपपत्र रद्द करण्यात येते. परंतु ज्या अर्जदारांची वाटपपत्रे रद्द करण्यात आली होती त्यांना आता त्यांचे स्वप्नातले घर मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला असून दिनांक ३० जून २०२० पर्यंत संबंधित अर्जदारांनी विलंब शुल्कासह सदनिकांचे हफ्ते भरायचे आहे.   वाटपपत्रे रद्द झालेल्या अर्जदारांची स्वप्नातले घर प्राप्त करून घेण्याची संधी चुकू नये यासाठी सिडकोतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु दिनांक ३० जून २०२० नंतर संबंधित अर्जदारांना सदनिकांसाठीचे हफ्ते भरण्याची पुनःश्च संधी उपलब्ध होणार नाही याची अर्जदारांनी कृपया नोंद घ्यायची आहे. जनसं

अन्यायकारक वीज दरवाढी विरोधात कामगार संघटना आक्रमक

उरण - जेएनपीटी वसाहतीमध्ये राहणाऱ्या कामगारांना पुरविण्यात येणाऱ्या विजेच्या दरात अन्यायकारक भरमसाठ वाढ केली. यापूर्वी हे दर वसाहतीत असणाऱ्या इमारतीच्या वर्गीकरणाप्रमाणे निश्चित केले होते. परंतु नवीन परिपत्रकाप्रमाणे कामगारांच्या मुळचेतनाशी ते जोडले आहेत. हे दर अवाजवी तर आहेतच पण त्यामुळे समान वीज यूनिट वापरणाऱ्या पण वेगळे मूळवेतन असणाऱ्या दोन कामगारांना वीजबिलाची रक्कम वेगळी असणार आहे. प्रशासनाची ही कृती बेकायदेशीर आहे जेएनपीटी वर्कर्स युनियनने या संदर्भात मुख्य सचिव (प्रशासन) यांची आज ( दि.१३) त्यांच्या दालनात भेट घेवून प्रशासनाची ही कृती बेकायदेशीर आहे हे पटवून देवून सदर परिपत्रक त्वरित रद्द करण्याची मागणी केली व सर्व मान्यताप्राप्त कामगार संघटनांशी चर्चा केल्यानंतर यासबधी निर्णय घेण्याची जोरदार मागणी केली.  तसेच हे परिपत्रक वेतन कराराचे भंग करणारे असल्याचे ठणकावून सांगितले. वसाहतीत राहणाऱ्या कर्मचान्यांना घरभाडे भत्याच्या बदल्यात मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेवून त्यात समाधानकारक बदल होई पर्यंत कोणतीही प्रस्तावित दरवाढ लागू न करण्याचीही जोरदार मागणी युनियन तर्फे केली. मुख्य सचिव (प्र

जीएसटी भवनच्या नवव्या मजल्यावर भीषण आग्नितांडव

मुंबईतील जीएसटी भवनमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी मुंबईतील माझगाव परिसरात असलेल्या जीएसटी भवनच्या नवव्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 20 ते 22 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार वाय बी सेंटरमधील राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सोडून घटनास्थळी रवाना झाले आहेत.मुंबई अग्निशमन दलाला लेव्हव 3 चा हा कॉल दिला आहे, त्यामुळे आगीची तीव्रता मोठी असल्याचं कळतं. धूर येत असल्याचं समजताच इमारतीमधील कर्मचारी बाहेर पडले आहे. परंतु याबाब अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसंच इमारतीमधील बहुतांश साहित्य लाकडी असल्याने आग झपाट्याने पसरत आहे. नव्या इमारतीला ही आग लागली आहे

शिवजयंती निमित्त मराठा समाज खारघर यांच्या वतिने व्याख्यान आयोजित करण्यांत आलेले आहे

जाहिर निमंत्रण शिवजयंती निमित्त मराठा समाज खारघर यांच्या वतिने महाराष्टातील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते मा. श्री. जयवंत पाटिल यांचे जाहिर व्याख्यान आयोजीत  करण्यांत आलेले आहे, तरी समस्त खारघरवासियांनी आवर्जून उपस्थित राहुन आस्वाद घेउन, कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही आग्रहाची विनंती !!!*   तारीख :- १६ फेब्रुवारी  वेळ:- सायंकाळी ६.१५ वा. ठिकाण:- उत्कर्ष हाँल से. १२ खारघर. सौजन्य  *मराठा समाज खारघर* 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 टिप- हा मेसेज जास्तीत जास्त शिवप्रेमींना पाठवा, जेणेकरून त्याचा सर्वाना लाभ मिळेल.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजे प्रतिष्ठान पनवेल यांच्यावतीने भव्य अन्नदान सोहळा

राजे प्रतिष्ठान पनवेल यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य अन्नदान सोहळा ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला कोणीही उपाशी झोपू नये ही संकल्पना ठेवून अन्नदान सोहळ्याचे आयोजन केले आहे तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. यावेळी प्रवीण मोहोकर प्रस्तुत गर्जतो मराठी पोवाडा व स्फूर्ती गीतांचा कार्यक्रम देखील आयोजित केला आहे. ठिकाण : छत्रपती संभाजी महाराज मैदान, पनवेल महानगर पालिकेच्या मागे, पनवेल. वेळ : संध्याकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांचे पुनर्वसित भूखंडांवर मोठया प्रमाणावर बांधकाम सुरू 

  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प व अनुषंगिक कामासाठी स्थलांतरीत होणाऱ्या बांधकामाबद्दल प्रकल्पबाधितांना देशातील सर्वोत्तम अशा 22.5% व पुनर्वसन व पुनःस्थापना पॅकेजअंतर्गत भूखंडांचे वाटप करण्यात येत आहे. बहुतांश  प्रकल्पबाधितांना सदर भूखंडांवर बांधकाम सुरू करण्यासाठी बांधकाम परवानगी देण्यात आली असून या प्रकल्पबाधितांनी त्या अनुषंगाने आपल्या भूखंडांवर बांधकाम करण्यास सुरूवातदेखील केली आहे.  बांधकाम परवाना मिळवण्यासाठीची प्रक्रीया अतिशय सुलभ असून ती सहज समजण्यासारखी आहे. विमानतळ प्रकल्पबाधितांना त्यांचे बांधकाम तातडीने सुरू करण्यासाठी बांधकाम परवानगी लवकरात लवकर मिळणे आवश्यक असल्याने सिडको महामंडळ सदर बांधकाम परवाने प्रकल्पबाधितांना सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.  प्रकल्पबाधितांनी त्यांना प्राप्त झालेल्या भूखंडांवर ज्या प्रमाणात बांधकाम करायला सुरूवात केली आहे त्यावरून हे एक सर्व सोयी सुविधांनी युक्त, नियोजनबद्ध व स्वयंपूर्ण असे नगर निर्माण होणार यात शंका नाही. त्याचबरोबर विमानतळ प्रकल्पाचे कामदेखील वेगाने सुरू असून सभोवतालच्या परिसराचा कायापालट होत असल्याचे स्पष्ट

पत्रकाराला मारहाण करणारा पोलीस अधिकारी निलंबित पत्रकारांच्या एकजुटीचा विजय

मुंबई :पत्रकारांच्या एकजुटीचा पुन्हा एकदा विजय झाला आहे. मिडेचे वरिष्ठ छायाचित्रकार एका आंदोलनाचे   छायांकन  करीत असताना पोलिसांनी त्यांना मारहाण केली होती.. मराठी पत्रकार परिषदेसह मुंबईतील व  पत्रकार संघटनांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली.. तयानुसार नागपाडा पोलीस ठाण्याचे एपीआय बोरसे यांना चौकशी होईपर्यंत निलंबित करण्याचे तर दुसरे अधिकारी शेख यांचा प्रोबेशन कालावधी वाढविणयाचा आदेश गृहमंत्र्यांनी दिला आहे.. पत्रकार संघटनांच्या एकजुटीचा हा विजय मानला जात आहे.. "मिड डे" चे वरिष्ठ छायाचित्रकार  आशीष राजे यांच्यावर गुरूवार  दिनांक ६ फेब्रुवारी रोजी  पोलिसांनी केलेल्या मारहाण प्रकरणी आज गृहमंत्री अनिल  देशमुख यांच्या  सोबत झालेल्या पत्रकार संघटनांच्या बैठकीत राजे   मारहाण  प्रकरणी नागपाडा पोलिस ठाण्याचे अधिकारी बोरसे (एपीआय) यांची चौकशी होईपर्यंत निलंबित तर दुसरे पोलिस अधिकारी शेख (पीएस आय) यांचा प्रोबेशन कार्यकाळ वाढविला जाईल असा निर्णय घेण्यात आला.या बैठकीला सहपोलीस आयुक्त विनयकुमार चौबे उपस्थित होते. राजकीय मोर्चे, आंदोलने किंवा कोणत

आरटीईसाठी २०२० ते २०२१ प्रवेशप्रक्रिया आजपासून सुरू

मुंबई  : आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवर पात्रताधारक पालकांना त्यांच्या पाल्यांच्या प्रवेशासाठी आज ११ ते २९ फेब्रुवारी या १५ दिवसांच्या कालावधीत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर ११ व १२ मार्च असे दोन दिवस लॉटरी काढण्याची प्रक्रिया चालणार असून, या लॉटरीच्या माध्यमातून प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना १६ मार्च ते ३ एप्रिल या १५ दिवसांच्या कालावधीत गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी करून संधी मिळालेल्या शाळेत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.  आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी यापूर्वी नोंदणी केलेल्या शाळांना स्वयंचलितरीत्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया दि.२१ जानेवारीपासून सुरू झाली असून, सोबतच गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून नवीन नोंदणी केलेल्या शाळांची पडताळणीही सुरू झाली आहे. ही पडताळणी प्रक्रिया ६ फेब्रुवारीर्यंत चालणार असून, त्यानंतर ११ ते २९ फेब्रुवारी या १५ दिवसांच्या कालावधीत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी मिळ

हिंगणघाट जळीतकांडातील आरोपीला फासावर लटकवू

हिंगणघाट : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीला कोणताही दया माया दाखवली जाणार नाही. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल, गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या तरुणीवर आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं. मागील सोमवारी ही घटना घडली होती. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते. डॉक्टरांचं विशेष पथक तरुणीवर उपचार करत होतं. मात्र, सोमवारी अचानक ह्रदयविकाराच्या धक्क्यानं तिचा मृत्यू झाला. “आरोपीला कोणताही दया माया दाखवली जाणार नाही. या सगळ्याचा आम्ही पाठपुरावा करु. अनेकदा अशा प्रकरणांची न्यायालयात बराच वेळ सुनावणी सुरु असते. निकाल लागला तरी शिक्षा होण्यास वेळ लागतो. तसं या बाबतीत घडू देणार नाही. लवकरात लवकर गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अशा पद्धतीचं कृत्य करण्याची हिंमत होणार नाही असा कायदा करु असं आश्वासनही दिलं. याआधी राष्ट्रवादी काँग्रेस न

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार १७ फेब्रुवारी या तारखेला शुभारंभाचा मुहूर्त

  मांडवा ते भाऊचा धक्का रो-रो सेवा १७      फेब्रुवारीला  होणार अलिबाग : अलिबागकरांना प्रतीक्षा असलेली रो-रो मुंबई बंदरात दाखल झाली असून येत्या १७ फेबु्रवारी शिवजयंतीच्यानिमित्ताने ही सेवा सुरु होणार आहे. याबाबत अधिकृत माहिती सरकारने दिलेली नसली तरी सूत्रांनुसार राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते रो-रो सेवेचे उद्घाटनाचा करण्यात येणार आहे. मांडवा ते भाऊचा धक्का अशी रो-रो सेवा सुरु होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर सर्वांचेच लक्ष या बोटीकडे होती. मोठ्या प्रतिक्षेनंतर ही रो-रो बोट ग्रीसमधून भारतात दाखल झाली आहे. ‘प्रोटो पोरोस एक्स व्ही’ असे या बोटीचे नाव आहे. या बोटीची चाचणी तसेच अन्य तांत्रिक बाबी पूर्ण केल्या जात आहेत. भाऊचा धक्का ते मांडवादरम्यान रो-रो बोट सेवा सुरू होणार आहे. ही सेवा सुरु झाल्यानंतर या बोटीमधून बस कार, बाईक, अन्य वाहने केवळ तासाभरातच अलिबाग गाठता येणार आहे. प्रवाशांसह पर्यटकांची मोठी सोय होणार असून रायगडच्या पर्यटन व्यवसायाला खर्‍या अर्थाने चालना मिळेल, अशी व्यावसायिकांचे म्हणणे आहे. २०१६ साली प्रत्यक्षात या कामाला सुरुवात झाली. १३५ कोटींच्या या प्रकल्पाचा ठे

महाविकास आघाडीचा कामांचा झटपट निर्णय

अवकाळी पावसामुळे यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही प्रचंड नुकसान सहन करावे लागले. हे लक्षात घेऊन महाविकास आघाडी सरकारने कापूस खरेदीसाठी १८०० कोटी रुपयांची शासनहमी देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून २०१९-२० मध्ये किमान हमी भावाने खरेदी करण्यात येणाऱ्या कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना वेळेत देता यावेत, यासाठी कापूस पणन महासंघाने बँक ऑफ इंडीयाकडून ७.७५ टक्के या व्याजदराने कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीने १८०० कोटी रुपयांची शासनहमी देण्याचा निर्णय घेतला आहे. या शासन हमीवर महासंघाला द्यावे लागणारे हमी शुल्कही माफ करण्यात येणार आहे.  सांडपाण्यावर प्रक्रीया करण्यासाठी २८२० कोटींचा निधी राज्यातील महापालिका आणि नगरपरिषद क्षेत्रात पहिल्या टप्प्यात सांडपाण्यावर प्रक्रीया करण्यासाठी २८२० कोटी इतका निधी केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान दोन किंवा राज्य शासन पुरस्कृत महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानातून उभारण्यात येणार आहे. राज्यातल्या ३९१ स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ९७५८.५३ एमएलडी सांडपाणी निर्माण होते. राष्ट्रीय

महाराष्ट्र राज्याचे मंत्री, नगर विकास सार्वजनिक बांधकाम व तसेच ठाणे आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री . एकनाथ शिंदे साहेब यांचा वाढदिवस

महाराष्ट्र राज्याचे मंत्री,  नगर विकास सार्वजनिक बांधकाम व तसेच ठाणे आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री . एकनाथ शिंदे साहेब यांना वाढदिवसानिमित्त टि.व्ही सिरिअल चे अभिनेता विनोद शिंदे यांनी भेट घेवुन त्यांना  फुलगुच्छ व तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  संपादक  : संदेश सोनमळे  मोबाईल : ९७६८११२३३७ ईमेल : navlokhitdrushti2014@gmail.com  बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा 

🚩 मराठा उद्योजकांसाठी कर्जयोजना 🚩 (व्याजपरतावा स्वरूपात) अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ

  ● या योजनेचा फायदा कुणाला मिळेल? मराठा समाजातील उद्योग करू पाहणाऱ्या किंवा उद्योजक असणाऱ्या बांधवांसाठी बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या व्याजाची रक्कम अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मार्फत दिली जाईल. लहान उद्योजकांसाठी 5 ते 10 लाखांपर्यंत कर्जावरील व्याज महामंडळ देईल. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्याच्या District Coordinator (जिल्हा समन्वयक) यांना संपर्क करा. Akola  Shradha Sathe 9403083623/ 9767123666 Amravati Sonali Motghare 8805497414 Nilesh Wakode 9764252049 Buldhana Nilesh Shinde 9881824299 Purushottam Ambhore 8308949420 Washim  Amol Marewad 9665525651 Yavatmal   Yogesh Kakade 9561446607  Aurangabad Pravin Agwan8625007658 Samadhan Suryanshi 9359790870 Beed Kalidas Thaware 7709571715 Amit Malegaonkar 8605501434 Hingoli  Ganesh Darade7028733933 Latur Prashant Jadhav 9421554740 Jalna Umesh Kolhe 9545399405 Santosh Raut 9766545115 Parbhani  Altaf Shaikh 9579523517 Nanded  Shubham Shevankar 8446957046 Osmanabad  Prashant Ghule 9028502525 Mumbai City  Pratiksha Chavan 9561256126 Mumbai Sub