पनवेल,दि.25 : लोकशाही भक्कम करण्यासाठी आपण एकत्र येऊया, लोकशाही जागृत ठेवण्याच्यासाठी आपण सारे मिळून प्रयत्न करत राहूया, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे आणीबाणी कालावधीत लोकशाहीचा लढा व बंदिवास भोगावा लागलेल्या मान्यवरांचा सन्मान या विशेष कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक 25 जुन रोजी आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये करण्यातआले यावेळी ते बोलत होते.पुढे ते म्हणाले,आणीबाणीच्या काळात लोकशाही पुर्नप्रस्थापित करण्यासाठी , त्यावेळी जे अन्याय अत्याचार सुरू होते, ते थांबविण्यासाठी ज्यांनी सक्रिय भूमिका बजावली अशा मान्यवरांच्या कर्तृत्वाचा अभिमान पनवेलकरांना आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. या कार्यक्रमास महापालिका कार्यक्षेत्रातील आणीबाणी कालावधीत लोकशाहीच्या लढ्यांमध्ये बंदिवास भोगावा लागलेले 7 मान्यवर,आमदार प्रशांत ठाकूर, मनपा आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे ,उपायुक्त सर...
वाहन चालकांसाठी दंड तपासणी व भरण्याची सुविधा उपलब्ध पनवेल प्रतिनिधी : वाहन चालकाने नियमाचे उल्लंघन केल्यानंतर त्यांना ऑनलाईन दंड आकारला जातो. तो आकारलेला दंड भरायचा कुठे माहिती नसल्यामुळे वाहन चालक चालकांचा वेळ वाया जात होता ही बाब लक्षात घेऊन खारघर उड्डाणपुला खालील मंकी पॉईंट येथील वाहतूक चौकी येथे वाहनचालकांसाठी दंड तपासणी व भरण्याची सुविधा खारघर वाहतूक पोलीस शाखेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणी वाहन चालक आपल्याविरोधातील प्रलंबित दंड तपासू शकतात तसेच तिथेच दंडाची रक्कम भरू शकतात. वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे वाहनचालकांना पोलीस ठाणे किंवा इतर कार्यालयात जावे न लागता थेट चौकीवरच आवश्यक ती कारवाई पूर्ण करता येणार आहे. यामुळे वेळेची बचत होणार असून वाहतूक व्यवस्थेत पारदर्शकता आणि शिस्त वाढण्यास मदत होईल या राबवत असलेल्या मोहिमेचे वाहन चालकांनी खारघर वाहतूक शाखेचे कौतुक केले आहे.